महाराष्ट्र : रितेश आणि जेनेलियाच्या वेड या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या चित्रपटाने सैराट या मराठी चित्रपटाचा देखील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी रितेश जेनेलियाच्या या वेड चित्रपटाने ५ पूर्णांक ७० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
https://youtu.be/KKM-EP1cyck
ही एक कॉमेडी लव ट्रँगल स्टोरी आहे. रितेश देशमुख याचे भन्नाट दिग्दर्शन आणि मराठीतील अशोक सराफ विद्याधर जोशी शुभंकर तावडे जिया शंकर विक्रम गायकवाड खुशी हजारे आणि विनीत शर्मा यांच्या भूमिकांनी वेड ला एका वेगळ्या यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे.
https://youtu.be/N5wXloh1ma0
जेनेलियाची मराठी देखील ऐकण्यासारखी आहे. चित्रपटाचे कथानक फारसे चांगले नसताना देखील दिग्दर्शन, अभिनय, संगीत हीच या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू आहे. त्यात टायटल ट्रॅकमध्ये सलमान खानच्या एन्ट्रीने देखील धमाल आणली आहे.