सोलापूर : मराठा आरक्षणाचा पुन्हा एकदा एल्गार होणार असल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा मोर्चा, संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा संघाच्या बैठकीत एकमतानं घेण्यात आल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रवी मोहिते यांनी केलाय.
घटनात्मक तरतूद असलेल्या 50 टक्के आरक्षणातूनच मराठा आरक्षण मिळावं यासाठी सोलापुरात आरक्षण परिषदेचं आयोजन
करण्यात येणार आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा निर्धारही या बैठकीत घेण्यात आला.