17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर,’या’ दिवशी होणार मतदान

342 0

राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्टला मतदान होणार असून,या निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे.
पुणे,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर,औरंगाबाद,जालना,बीड,उस्मानाबाद,लातूर,अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि ४ नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेचच 22 ते 28 जुलै पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र भरणे आवश्यक आहे.

Share This News
error: Content is protected !!