चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

655 0

पुणे : जिल्ह्यातील २०५- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून एस. सत्यनारायण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-१०४ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०२ असा आहे.

निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून अनिल किशोर यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-३०१ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०१ असा आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून संकल्प नारायण सिंग यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-३०२ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४५४१६१० असा आहे.

निवडणूक निरीक्षक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९७२५४६ असा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!