VIDEO : मुलुंड पूर्व परिसरात इमारतीतील घराचा स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू; इतर कुटुंबांना अन्यत्र हलवलं…

293 0

मुलुंड : मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरातल्या एका इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

मोठी छाया नावाच्या या इमारतीत हे कुटुंब वास्तव्यास होतं. ग्राउंड प्लस टू अशी या इमारतीची रचना होती. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत देवशंकर शुक्ला (वय 93) आणि आरती शुक्ला (वय 87) या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि या जखमी दाम्पत्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

महत्त्वाचं म्हणजे ही इमारत पालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित केली गेली होती. तरी देखील काही कुटुंबं या इमारतीत वास्तव्यास आहेत. या दुर्घटनेनंतर मात्र या सर्व कुटुंबांना या इमारतीतून इतर ठिकाणी हलविण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!