महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे गट आज दुपारी गोव्याकडे रवाना होणार ! काय आहे पुढील प्लॅन ?

407 0

गुवाहाटी- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आज गुवाहाटी येथून आज दुपारी साडेतीन वाजता गोव्याच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी गोव्यातील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये 71 खोल्याही बुक करण्यात आल्या आहेत. त्यानंतर उद्या सकाळी गोव्याहून मुंबईला येणार असून उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी विधान भवनात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आज एकनाथ शिंदे गटाने गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. दरम्यान शिंदे गटाकडून आसाम पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप करत एकनाथ शिंदे यांनी सूरतमार्गे गुवाहाटी गाठलं. यानंतर शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेतील अनेक दिग्गज नेते आणि आमदारांनी गुवाहाटी गाठलं. आसाममधील भीषण पूरस्थिती आणि तिथं हॉटेलमध्ये थांबलेल्या या शिवसेना आमदारांवर टीका देखील झाली. तिथल्या काही स्थानिकांनी याविरोधात निदर्शनं देखील केली होती.

आज हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमधून निघणार आहेत.  सगळे आमदार बाराच्या सुमारास कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. तिथून दर्शन केल्यानंतर तीनच्या सुमारास गुवाहाटी विमानतळावर पोहोचणार आहेत. तिथून ते गोव्याला पोहोचणार असल्याची माहिती आहे. याआधी शिंदे यांनी आसाममधील पूरग्रस्तांना 51 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

Share This News
error: Content is protected !!