Earthquake In Hingoli : हिंगोली जिल्ह्यात भूकंप; 3.6 रिश्टर स्केलची नोंद

565 0

हिंगोली : काही दिवसांपासून देशांमध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज पहाटे साडेचारच्या सुमारास महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत आणि कळमनुरी या तीन तालुक्यांमध्ये गावात आज पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

जिल्ह्यात ३.६ रिश्टर्स स्केलचा भूकंप झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार या भागांमध्ये यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही वित्त हानी झालेली नाही. तर प्रशासनाकडून नागरिकांना भयभीत न होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!