ऐन सणासुदीत पुणेकर वाहतूक कोंडीने हैराण ; पुन्हा होणार स्फोट, फुटणार खडक, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू !

494 0

पुणे : 2 ऑक्टोबरला चांदणी चौकातील फुल पाडण्यात आला. त्यानंतर आता पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा असतानाच सोमवारी चौकाला जोडणारा प्रत्येक मार्ग मोठ्या प्रमाणावर कोंडला गेला होता. त्यामुळे चांदणी चौकातील पूल पाडला तरीही अद्याप चौकाचा श्वास मोकळा झाला नाहीये. दरम्यान 4 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा ते पाच ऑक्टोबर म्हणजेच बुधवारी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत चांदणी चौक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

See the source image

मिळालेल्या माहितीनुसार, चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर आता त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे लगतचे खडक फोडण्याचे काम लागलीच सुरू करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी दीड तासांसाठी वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यानंतर आज रात्री साडेअकरा ते उद्या मध्यरात्री दीड वाजेपर्यंत या ठिकाणी ब्लॉक घेतले जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद करण्यात येणार आहे.

See the source image

पुन्हा एकदा स्फोट घडवून हा खडक फोडण्यात येणार आहे. यावेळी साताऱ्याच्या दिशेने मुंबईकडे जाणारी वाहतूक दहा ते पंधरा मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. स्फोट झाल्यानंतर लगेचच वाहतूक मार्ग सुरू होणार आहे. दरम्यान मुंबईहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. ही वाहतूक येथील राडाराडा हटवल्यानंतर रात्री दीडनंतर पूर्ववत केली जाणार आहे. त्या दरम्यान वाकड मार्गे वाहतूक वळवण्यात येईल अशी माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आयुक्त आनंद भोईटे यांनी दिली.

पुणे सोलापूर रस्त्यावर ट्रकचा अपघात

आज सकाळी काळुबाई चौक पुणे सोलापूर रस्त्यावर ट्रक पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. भर रहदारीच्या रस्त्यावर ट्र्क पलटी झाला त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या . या अपघातात जीवित हानी किंवा कोणीही जखमी नाही . परंतु हडपसर कडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ऐन कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागला आहे

Share This News
error: Content is protected !!