#CRIME NEWS : दारूच्या नशेत नातवाने 90 वर्षाच्या आजीला मारहाण करून संपवलं; वडिलांना उचलून जमिनीवर आपटलं, दारुणे कुटुंब उध्वस्त केलं !

784 0

नवी दिल्ली : दारूच्या आहारी गेल्याने आजपर्यंत अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अजून एक उदाहरण त्यामध्ये आता मोजले जाणार आहे. हे प्रकरण आहे दिल्लीतील प्रेमनगर परिसरात घडलेले. या दारूच्या आहारी गेलेल्या नातवाने आपल्या आजीला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये आजीचा मृत्यू झाला तर वडिलांना देखील अक्षरशः उचलून जमिनीवर फेकून दिल्याचा प्रकार घडल्याचं समजत आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अफरोज (वय वर्ष 62) हे आपल्या कुटुंबासोबत इंदर एकलव किराडिया परिसरात राहतात. त्यांच्यासोबत त्यांची 90 वर्षाची आई आणि तीन मुलं शाहरुख (वय वर्ष 30), इमरान (वय वर्ष 28) आणि रशीद (वय वर्ष 22) हे राहतात. दरम्यान 11 फेब्रुवारीला रात्रीच्या दरम्यान शाहरुख हा मोठ्या प्रमाणावर दारू पिऊन घरी आला. शाहरुख याला दारूचे व्यसन होते.

या दारूच्या नशेतच त्याने किरकोळ कारणावरून घरात भांडण सुरू केले. त्यानंतर त्याने वडिलांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी वडिलांना उचलून त्याने फरशीवर फेकले. हे भांडण थांबवण्यासाठी 90 वर्षाची आजीमध्ये पडली असता तिला देखील बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्या आजींचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अफरोज यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Share This News
error: Content is protected !!