कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नीतीची आत्महत्या

342 0

बंगळुरु- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नातं डॉ. सौंदर्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ सौंदर्या ही येडियुरप्पा यांची लहान मुलगी पद्मा यांची मुलगी आहे. ती बेंगळुरू येथील तिच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील मदतनीस महिलेने बराच वेळ दरवाजा ठोठावला. मात्र दरवाजा न उघडल्याने तिने डॉ सौंदर्या यांचे पती डॉ. नीरजला फोन करून माहिती दिली. डॉ. नीरज हे घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला असता डॉ. सौंदर्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

डॉ सौंदर्या ही येडियुरप्पा यांची लहान मुलगी पद्मा यांची मुलगी आहे. बेंगळुरूच्या एम एस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. त्या पती डॉ. नीरज आणि 9 महिन्यांच्या मुलासोबत माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहत होती. तीन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह आता शवविच्छेदनासाठी सरकारी बोअरिंग रुग्णालयात पाठवण्यात आला.

या घटनेमुळे येडियुरप्पा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Related Post

लाइक बटनावर क्लिक केले आणि माजी सैनिकाच्या खात्यातून १ कोटी लंपास झाले

Posted by - April 4, 2023 0
पुणे शहरात ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. क्षणिक मोहापायी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकून लोक लाखो रुपयांची फसवणूक…

महिन्याभरात होणार होतं लग्न… इमारतीखालीच आढळला होणाऱ्या बायकोचा मृतदेह; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

Posted by - March 18, 2023 0
सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असू होणाऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही आपलं आयुष्य संपवलं आहे.…

BIG NEWS : ‘हिजाब’वर होईना न्यायाधीशांचे एकमत; तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवलं , वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - October 13, 2022 0
नवी दिल्ली : कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये घातलेल्या हिजाब बंदीवर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांचं एकमत होऊ शकले नाही. जस्टीस सुधांशू…

बाळासाहेब ही म्हणाले असतील शाब्बास संजय!; केदार दिघे यांचं ट्विट चर्चेत

Posted by - July 31, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं असून संजय राऊत यांच्यावर…

राज्य सरकार यापुढे असेच लोकहिताचे निर्णय घेत राहील; मनसेच्या एकमेव आमदाराने मानले राज्य सरकारचे आभार

Posted by - July 14, 2022 0
मुंबई: आज झालेल्या बैठकीत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *