” 30 लाख रुपये नही दिये तो, रेप केस मे अंदर कर दुंगी…!” मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, वाचा सविस्तर प्रकरण

644 0

पुणे : पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खंडणीसाठी ही धमकी देण्यात आली आहे. खंडणी द्या अन्यथा गोळी घालू अशी धमकी वसंत मोरे यांच्या मुलाला देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांना एका व्यक्तीने 30 लाखासाठी धमकी दिली आहे. ” तीस लाखाची खंडणी दे नाहीतर मुस्लिम मुली सोबतच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र व्हायरल करण्यात येईल” अशा आशयाचा हा मेसेज असल्याच समजतंय. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपेश मोरे यांनी अनफिया शेख या मुस्लिम मुली सोबत विवाह केल्याचा दावा ही अज्ञात व्यक्ती करत असून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील बनवण्यात आलं असल्याचं या व्यक्तीने म्हटलं आहे. तसेच या मेसेजमध्ये ” हमने आपके नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है, खराडी आयटी पार्क के सामने गाडी मे तीस लाख रुपये रख देना, नही तो आपके उपर रेप के केस को दर्ज कर देंगे !” असा धमकीचा मेसेज देखील रुपेश मोरे यांना या व्यक्तीने केला असल्याचा समजते
.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide