घृणास्पद प्रकार : नृत्यांगना गौतमी पाटीलचा तसला व्हिडिओ व्हायरल ; फॉरवर्ड करू नका गौतमीचे आवाहन ; वाचा काय आहे प्रकरण

1130 0

पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील ही तिच्या शोमुळे नेहमीच चर्चेत असते अनेक ठिकाणी तिचे डान्स शो आयोजित केले जातात. पण गौतमी नुकतीच पुन्हा एका अश्लील व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. एका स्टेज शोच्या दरम्यान कपडे बदलत असला असताना गौतमी पाटील हिचा अश्लील व्हिडिओ कोणीतरी शूट केला आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, गौतमी पाटील ही सध्या तरुणांच्या हृदयावर राज्य करते आहे. काही दिवसांपूर्वी नृत्यातील तिच्या वाईट हावभावामुळे ट्रोल झाली होती. त्यानंतर तिने माफी देखील मागितली होती. दरम्यान नुकताच एका स्टेज शो दरम्यान कपडे बदलत असताना कोणीतरी बदनामी करण्याच्या हेतून तिचा व्हिडिओ शूट केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर गौतमी हिने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडिओ एकमेकांना फॉरवर्ड करू नका असं आवाहन सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!