खळबळजनक ! दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले ? कुणी केला दावा ?

594 0

एकनाथ शिंदे समर्थक नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. इतकच नव्हे तर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

अहमदनगर येथे आज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. यावेळी त्यांनी दीपाली सय्यद सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरित्व दिले असल्याचा पुरावा सादर केला. दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते असून त्यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असल्याचे भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दीपाली सय्यद यांच्या या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले हे नेते दिपाली सय्यद यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु आहे म्हणाले. असेही शिंदे म्हणाले. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नसल्याचे शिंदे यांनी म्हटलंय.

दीपाली सय्यद यांच्या पाकिस्तान कनेक्शनचे थेट पुरावेच आम्ही दिले आहेत. त्यानंतरही कारवाई झाली नाही तर आगामी काळात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही आणि राज्यातील भाजप कार्यालये तोडफोड करून जाळून टाकू, असा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!