काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिग्विजय सिंह यांची माघार; निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचे करणार समर्थन

263 0

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज दाखल करण्याचा 30 सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे . अर्थात आजच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असून ,8 ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे .

दरम्यान एक मोठी बातमी समोर येते आहे. दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळेच आता अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये लढत होईल. या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचे समर्थन करणार असल्याचे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केल आहे. दरम्यान “आयुष्यभर काँग्रेससाठी काम केलं आणि करत राहील, त्यामुळे खर्गे यांच्या विरोधात लढण्याचा विचारही करू शकत नाही. ” असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!