#DHULE : काजू समजून खाल्ल्या चंद्रज्योतच्या विषारी बिया; धुळ्यात 7 चिमुरड्यांना विषबाधा

1022 0

धुळे : काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 7 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात घडली आहे. काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्यामुळे 7 चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड गावातील आदिवासी वस्तीत लहान बालकांनी खेळता खेळता काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांना शासकिय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात साध्य उपचार सुरु आहेत.

आपल्या घरा जवळ खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतच्या झाडाखाली पडलेल्या बिया दिसल्या खेळता खेळता काजू समजून मुलांनी या विषारी बिया खाल्ल्या मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागला. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं.

यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर 6 मुलं बेशुद्ध झाली असून त्यांच्यावर सध्या बाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्यांनी प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना देखील त्रास होत असल्याने त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Share This News
error: Content is protected !!