#DHULE : जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जुगाऱ्यांचा हल्ला; पाच पोलीस कर्मचारी जखमी

648 0

धुळे : धुळ्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे जिल्ह्यातील वरखेडी गावाजवळ रविवारी रात्री जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जुगाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पाच पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाच पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी झाले आहेत. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये 23 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 19 आरोपी अटक करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस कर्मचारी हे या जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेले असता, जुगार खेळणाऱ्या या जुगा-यांनी पोलिसांवर थेट हल्ला चढवला. यामध्ये पोलिसांचे अक्षरशः कपडे फाडून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचे समजते आहे. यामध्ये पाच पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. अधिक तपास धुळे तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!