#DHARMENDRA : अभिनेता धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी खास बातमी ! धर्मेंद्र आता OTT वर सुफी संत शेख सलीम चिश्ती यांच्या भूमिकेत दिसणार, पहा फोटो

748 0

ओटीटी जगताने बॉलिवूडच्या टॉप कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांनाही आपली अभिनय प्रतिभा दाखवण्याची संधी दिली आहे. सैफ अली खानपासून शाहिद कपूरपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स ओटीटी विश्वाकडे वळले आहेत.

विशेष म्हणजे सिनेमात त्याला जेवढं प्रेम मिळालं, तसं प्रेम त्याला डिजिटल प्रेक्षकांचंही मिळालं. या स्टार्सनंतर आता वयाच्या 87 व्या वर्षी बॉलिवूडचे हेमन धर्मेंद्र ओटीटी विश्वात पाऊल ठेवणार आहेत. आपल्या व्यक्तिरेखेने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकणारे धर्मेंद्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर अत्यंत दमदार भूमिकेतून पदार्पण करणार आहेत.

सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे धर्मेंद्र झी 5 च्या ‘ताज-डिवाइडेड बाय ब्लड’ या ओरिजिनल सीरिजमध्ये दिसणार आहेत. ही मालिका एक पीरियड ड्रामा आहे, ज्यात मुघल साम्राज्याशी संबंधित गोष्टी चांगल्या प्रकारे चित्रित केल्या जातील.

या मालिकेत अदिती राव हैदरी अनारकली, अशिम गुलाटी प्रिन्स सलीमच्या भूमिकेत, ताहा शाह प्रिन्स मुरादच्या भूमिकेत, जरीना वहाब राणी सलीमा, संध्या मृदुल राणी जोधाबाई आणि राहुल बोसच्या भूमिकेत मिर्झा हकीम आहेत. झी 5 च्या या ओरिजिनल सीरिजमध्ये धर्मेंद्र सुफी संत शेख सलीम चिश्ती यांची भूमिका साकारणार आहेत.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी ‘ताज-डिवाइड बाय ब्लड’ चित्रपटातील दोन वेगवेगळे लूक शेअर केले आहेत. फर्स्ट लूकमध्ये त्यांनी लाल रंगाचा सुफी संतांचा पोशाख परिधान केला असून पांढऱ्या दाढीसह अभिनेत्याचा लूक एकदम अनोखा आहे.

Share This News
error: Content is protected !!