DHANAJAY MUNDE| घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे दोषी; न्यायालयानं काय दिला निर्णय?
धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार असून करुणा मुंडेंचे आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आले आहे धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले आहेत.
दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयानं दिले आहेत.
न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, ‘मी न्यायालयाचे आभार मानते. माझ्यासोबत माझी मुलं सुद्धा असल्याने आम्हाला १५ लाख रुपये दरमहा देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने २ लाख रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मी १५ लाख रुपयांची पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे.’
