एक दुःखद बातमी समोर आली ज्येष्ठ समीक्षक द्वारकानाथ सांझगिरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वयाच्या 74 व्या वर्षी सांझगिरी यांची प्राणज्योत मालवली असून पेशानं सिव्हिल इंजिनीयर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते.
सांझगिरी यांच्या लिखाणाला मराठी क्रिकेटरसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.