पुणे बंद ! महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य; राज्यपालांच्या हकालपट्टीची प्रमुख मागणी; पुण्यातील मूक मोर्चाचे पहा थेट दृश्य

375 0

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये मोठा वादंग निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज पुणे बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अस्मितेचा अपमान, पुणे बंद मध्ये सहभागी व्हा से आवाहन यावेळी करण्यात आलं होतं. आज सकाळपासूनच पुणे बंदला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते आहे.

आजच्या मूकमोर्चा मध्ये स्वतः खासदार उदयनराजे भोसले हे देखील सामील झाले आहेत. त्यासह विविध संघटनांनी देखील आजच्या बंदला पाठिंबा दिला आहे. मोर्चा आज डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झाला असून लाल महाल या ठिकाणी या मोर्चाचा समारोप होणार आहे.

डेक्कन जिमखाना पासून आजच्या या मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे व्यवसायिक राजकारणी यांसह हजारो सामान्य नागरिक देखील मोर्चामध्ये आज सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे

Share This News
error: Content is protected !!