उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून थेट दिल्लीला रवाना; अधिवेशन सुरू असताना दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

473 0

नवी दिल्ली : सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये रोजच या ना त्या कारणाने वादंग सुरू आहेत. आरोप प्रत्यारोप होत आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या आमदार कैलासवासी मुक्ताताई टिळक यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा नागपूरकडे अधिवेशनासाठी रवाना होतील अशी अपेक्षा असतानाच त्यांनी थेट दिल्ली गाठली आहे.

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला मोठे उधाण आले आहे. उपमुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा नक्की कोणत्या विषयासंदर्भात आहे याची माहिती मिळू शकली नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!