डेंग्यूने घेतला महिला पोलीस आणि ओल्या बाळंतिणीचा जीव ; 10 दिवसांपूर्वीच दिला होता गोंडस बाळाला जन्म

1001 0

पुणे : बारामती पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी शितल जगताप गलांडे यांचा मृत्यू झाला आहे. दुःखद म्हणजे अवाघ्या दहाच दिवसापूर्वी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. प्रसूती रजेवर गेल्यानंतर त्यांनी दहा दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांना केइएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

आज पहाटे त्यांची प्राणजोत मालवली, त्यांच्या अचानक जाण्याने बारामती पोलीस दलामधून हळहळ व्यक्त केली जाते आहे. प्रसूती रजेवर जाण्यापूर्वी प्रसुतीच्या तारखेपर्यंत त्यांनी मेहनतीचे काम केले. आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. त्यांच्यावर पणदरे या त्यांच्या राहत्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!