KIRIT SOMAIYYA : ” नोएडातील नियमबाह्य इमारती पाडल्या ; मुंबईतील अनधिकृत इमारतींचं काय ? “

625 0

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रविवारी नोएडा येथील नियमबाह्य ट्वीन टॉवर ही इमारत जमीन दोस्त करण्यात आली . दरम्यान मुंबईमध्ये अशा अनेक नियमबाह्य इमारती असून त्यांच्यावरही कारवाई हवी यासाठी आधी इमारतीचं स्पेशल ऑडिट करण्यात यावं , अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे .

मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना ते म्हणाले की, मुंबईत शेकडो इमारती अनधिकृत आहेत. अनेक इमारतींना ओसी देखील मिळाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या संदर्भात पत्र दिल आहे. महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी आणि बिल्डर यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

तसेच मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे. बिल्डर्स लॉबीने भ्रष्ट पद्धतीने महापालिकेच्या शासक अधिकाऱ्यांशी हात मिळवणी केली असून, सदनिका धारकांनी तसेच सोसायटीने चौकशी केल्यानंतर त्यांना अनधिकृत मजल्यांचा एफएसआय टीडीआर घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना पार्ट ओसी देण्यात आला आहे. अशा हजारो सदनिका मध्यमवर्गीयांना विकल्या. मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत टॉवर्स अनधिकृत मजल्यांचे तसेच ज्या इमारतींना अजूनही ओसी प्रमाणपत्र मिळालेला नाही. त्यांचे स्पेशल ऑडिट व्हावे असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!