मेष रास : अनेक दिवसांपासून तब्येतीच्या काही कुरबुरी जाणवत आहेत. मोठ्या प्रवास झाल्याने शिन देखील आला आहे. परंतु यासाठी आराम करणे आवश्यक आहे. सर्व कामकाजातून सुट्टी घ्या. खिशात खेळणारा पैसा चुकीच्या ठिकाणी घालवू नका. कौटुंबिक सहकार्य मिळेल, पण त्यासाठी तुम्हालाही डोळे उघडे ठेवावे लागतील.
वृषभ रास : अनेक दिवसांपासून रेंगाळलेले काम आज पूर्ण होणार आहे. आर्थिक बाबीत उलाढाल करण्यासाठी दिवस चांगला. कौटुंबिक सुख मिळेल. तब्येतीला जपा.
मिथुन रास : वातावरण खराब असले तरीही तुम्ही आज मनाने बळकट असल्यामुळे शरीर देखील चांगली साथ देणार आहे. कौटुंबिक सुख मिळेल प्रगती होईल. शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी हालचाली सुरू कराल.
कर्क रास : ताणतणाव विसरून जा. रोजच एखाद्या घटनेने मन खट्टू होते. आज थोडी उभारी घ्याल. भावनांवर नियंत्रण आणायला शिका. कौटुंबिक सहकार्य मिळणार नाही. स्वतः मनाने खंबीर व्हा, कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल.
सिंह रास : आज तुमचा आक्रमकपणा थोडा मवाळ होईल. प्रत्येक कामात काही ना काहीतरी अडचण आल्याने संताप होईल. पण आजचा दिवस तुमचा नाही असे समजून डोक्यावर बर्फ ठेवा. आर्थिक चणचण जानवणार आहे. पण आला दिवसही जाणार आहे.
कन्या रास : अनेक दिवसांपासून जो त्रास तुम्हाला जाणवत आहे, तो आजार आज समूळ नष्ट होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
तुळ रास : विनाकारण पैसे खर्च करणे थांबवा. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नोकरी व्यवसायात बढती मिळेल. बाहेर फिरायला जाण्याचा मूड होईल
वृश्चिक रास : अनेक दिवसांपासून आलेली मरगळ आज मुलांमुळे पूर्णपणे संपेल. कौटुंबिक सुख मिळेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्या चुकीच्या सवयीमुळे त्रास होऊ शकतो.
धनु रास : नेहमी तुम्ही घरात राहून निवांत आयुष्य जगण्याकडे तुमचा कल असतो. पण आज बाहेर पडाल. खेळ खेळाल दिवस आनंदात जाईल. शैक्षणिक प्रगती होईल आर्थिक चणचण कमी होईल.
मकर रास : सातत्याने चिंता आणि स्वतःच्या प्रगती पेक्षा दुसऱ्याच्या अधोगतीचा विचार करणे थांबवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळणे सोपे होईल. टोचून बोलू नका, आरोग्याच्या तक्रारी जाणवतील पण आला दिवस निघून जाणार आहे.
कुंभ रास : आज तुम्हाला घराच्या बाहेर पडावे वाटेल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. पण त्यातून मरगळ येणार आहेत. तब्येतीला सांभाळा लांबचा प्रवास होऊ शकणार नाही. आधी आराम करा.
मीन रास : अनेक दिवसांपासून तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही केलेली मेहनत आणि मनोभावे परमेश्वराची केलेली भक्ती आज तुम्हाला फळ देणार आहे. दिवस उत्तम आहे आनंद घ्या.