RASHIBHAVISHY

वृषभ राशीला आज एखादा नवीन श्रीकृष्णा सारखा मित्र भेटणार आहे; वाचा तुमचे राशिभविष्य

965 0

मेष रास : आज तुमच्या दानी वृत्तीवर थोडा अंकुश ठेवा. परमेश्वराने दिलेल्या दहा टक्के भाग जरी दान केला तरीही पुण्य मिळते. आधी स्वतःची गरज पूर्ण करा ,तब्येतीची काळजी घ्या कुटुंबीयांची साथ मिळेल.

वृषभ रास : आज खास दिवस आहे. काही नवीन परिचय होतील. आज तुम्हाला एखादा मित्र भेटेल जो, आयुष्यात प्रत्येक संकटात खंबीर साथ देईल, मन समाधानी राहील, कुटुंबीयांच्या इच्छा पूर्ण कराल

मिथुन रास : आज ऑफिसला सुट्टी घेऊन आणि गृहिणी घर कामाला सुट्टी घेऊन दिवस आरामात आणि मजेत व्यतीत करण्यासाठी बाहेर पडण्याचा बेत आखतील. स्वतःसाठी जगाल, दिवस चांगला.

कर्क रास : आजचा दिवस उत्साह पूर्ण आहे. बाहेर पडाल, मनसोक्त जगाल, तब्येत ठणठणीत राहील, भविष्याचे बेत आखाल.

सिंह रास : आज एखादी खरेदी कराल. घरातील एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, तब्येत चांगली राहील, कुटुंबीयांची साथ मिळेल.

कन्या रास : आज अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. मोठ्या ओळखींचा वापर करा, मदत मिळेल, समाधानी रहाल दिवस चांगला

तुळ रास : आज तब्येतीच्या कुरबुरी जाणवतील पण दिवस मजेत घालवाल, कुटुंबीयांची साथ मिळेल, प्रेमविवाह जुळतील.

वृश्चिक रास : आज मनशांती मिळवण्याकडे कल राहील. ध्यानधारणा कराल, मानसिक आरोग्य चांगले राहील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल, दिवस चांगला

धनु रास : एकांतात अधिक राहण्याची तुमची सवय असल्यामुळे तुम्हाला आज लोकांमध्ये मिसळण्याचा कंटाळा येईल. पण बाहेर पडावेच लागेल, नवीन ओळखी होतील, दिवस आनंदात घालवाल.

मकर रास : आज तब्येतीच्या कुरबुरी जाणवतील. दारू सिगरेट पासून काही दिवस लांबच रहा. शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. नवीन संकट येऊ शकते मन बळकट राहू द्या

कुंभ रास : तब्येतीच्या तक्रारी जाणवतील नोकरी व्यवसायामध्ये धडपडी होतील कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. पण तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.

मीन रास : तुमचे कौतुक आज होणार आहेत. घरातून आणि जवळच्या लोकांमध्ये तुमचा धबधबा वाढेल. यश मिळेल दिवस उत्तम…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!