पुणेकरांनो कोरोना परत येतोय ! दगडूशेठ गणपती देवस्थानने पुन्हा केली मास्क सक्ती; वाचा सविस्तर

469 0

पुणे : कोरोनान दोन वर्ष जगभरामध्ये अक्षरशः थैमान घातलं. लोकांना आपापल्या घरामध्ये बंदिस्त होण्यास भाग पाडलं. अजून त्या वाईट दिवसांच्या आठवणी पूर्णपणे पुसल्या गेल्या नाहीत तर, पुन्हा एकदा कोरोनान दरवाज्यावर थाप द्यायला सुरुवात केली आहे.

चीन,ब्राझील,जपान या देशांमध्ये कोरोना न अक्षरशः तांडव सुरू केला आहे. अशातच आता भारतामध्येही केंद्राने प्रत्येक राज्याला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता दगडूशेठ गणपती देवस्थान प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. यापुढे आता तुम्हाला जर दगडूशेठ गणपती बाप्पांचा दर्शन घ्यायला जायचं असेल, तर तुम्हाला मास्क सोबत बाळगावाचं लागेल. वाढत्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन भाविकांना यावेळी करण्यात आलं. तर मंदिर प्रशासनाच्या वतीने ज्या भाविकांकडे मास्क नाहीत अशा भाविकांना मास्कच मोफत वाटप देखील केलं जात आहे.

Share This News
error: Content is protected !!