पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने 11 लाखाचे सोने केले जप्त; महिलेने सोन्याची अफरातफर करण्यासाठी लढवली अशी शक्कल

477 0

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिस्टम विभागाने ११ लाखाचे सोने केले जप्त केले आहे. सुमारे ११ लाखाच्या सोन्याची अफरातफर करणाऱ्या या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी प्रोफाइलिंग दरम्यान प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार २० डिसेम्बर रोजी बँकॉकहून पुण्याला येणा-या स्पाइसजेट विमानाने प्रवास करणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाला अडवले असता, दिल्ली येथील या महिलेने २७० ग्रॅम सोन्याची पेस्ट (२१० ग्रॅम २४ हजार सोने असलेली ) कॅप्सूल स्वरूपात आपल्या शरीराच्या पोकळीत लपवून ठेवली होती.

या महिलेकडून २ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. जप्तीचे बाजारमूल्य अंदाजे रु. 11.70 लाख आहे. अधिक तपस सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!