#CRIME NEWS : जन्मदात्रीनेच घेतला दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव; म्हणाली, “मला संभाळणं असह्य झालं होतं, चिडचिड व्हायची…!”

4622 0

औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये 6 फेब्रुवारीला एक धक्कादायक घटना घडली होती. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन चिमुकले बेशुद्ध झाले असल्याची तक्रार घेऊन कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी दोन्हीही मुलं मृत घोषित केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आईनेच आपल्या दोन्हीही चिमुकल्यांची हत्या केल्याचा समोर आलं होतं.

यानंतर आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आठवडाभर तिची कसून चौकशी सुरू होती. पण ती सातत्यानं तिचा जबाब बदलत होती. अखेर एक दिवस तिने मान्य केलं की मुलांना संभाळणं मला असह्य झालं होतं. माझ्याकडून त्यांचं काहीच सहन होत नव्हतं. माझी नेहमी चिडचिड होत होती. त्यामुळे मला हे सर्व संपवून बाहेर जायचं होतं. म्हणून मी दोन्ही मुलांची हत्या केल्याचं या महिलेने कबूल केलं.

त्यामुळे आईनच आपल्या दोन्हीही पोटच्या मुलांचा खून केला होता हे उघड झालं होतं. पण या घटनेला एक दुसरी बाजू देखील आहे. या दोन चिमुकल्यांची हत्या झाली ही गोष्ट दुर्दैवी आहेच, मात्र त्या आईची देखील एक बाजू आहे. या मुलीचे अवघ्या पंधराव्या वर्षी लग्न लावून देण्यात आले होते. त्यामुळे अल्पवयीन असतानाच तिला दोन मुलं झाली. या दोन्हीही मुलांचं संगोपन करत असताना तिच्या स्वतःच्या वयाचा आणि त्या मुलांच्या सांभाळाचा कुठेच मेळ बसत नव्हता. अखेर आईने या दोन्हीही मुलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

Share This News
error: Content is protected !!