पिंपरी : 26 ऑगस्ट 2011 रोजी दुपारी बारा ते दोनच्या सुमारास एका घरामध्ये घुसून महिलेची कोयत्याने हत्या आणि त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि 14 हजारांचा ऐवज चोरून नेणाऱ्या आरोपीला बारा वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सविस्तर माहिती नुसार, 26 ऑगस्ट 2011 रोजी फिर्यादी कार्यालयीन कामासाठी बाहेर गेलेले असताना त्यांच्या पत्नी शितल या घरी होत्या. त्यावेळी आरोपी लक्ष्मण वाघ हा ओव्हाळ यांच्या घरी गेला आणि ‘साहेबांनी मला गार्डनिंगच्या कामासाठी पाठवलं आहे…!’ असं शितल यांना सांगितलं. त्यानंतर घरात घुसून कोयत्याने वार करून शितल यांची हत्या केली आणि घरातील सोन्याचे दागिने मोबाईल असा दोन लाख 14 हजारांचा ऐवज लंपास केला होता.
याप्रकरणी तात्कालीन पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी तपास केला आणि लक्ष्मण वाघ याला पोलिसांनी त्याच्या मूळ गावी जाऊन ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी आणती आरोपीने शितल यांच्या खुनाची कबुली दिली. 19 सप्टेंबर 2011 रोजी लक्ष्मण वाघ ह्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आला, न्यायालयात या प्रकरणी 9 जानेवारी 2023 रोजी सुनावणी होऊन लक्ष्मण वाघ याला तब्बल बारा वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड तसेच पुरावा नष्ट करणे या गुन्ह्यासाठी तीन महिने साधा कारावास आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यासाठी सात वर्षे सक्षम कारावास आणि तीन हजार रुपये दंड असे कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.