CRIME NEWS : तंबाखूच्या व्यसनापायी आईचीच केली निघृण हत्या; आरोपी मुलगा…

394 0

पुणे (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलांनाच आपल्या जन्मदात्रीच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केला असल्याची माहिती मिळते आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान आरोपी मुलगा अमोल खिल्लारी वय वर्ष 23 यांने आईकडे तंबाखू खाण्यासाठी पैसे मागितले. आईने पैसे नसल्याचे सांगितल्यावर, मी घर सोडून जाईल अशी धमकी देखील त्यांना दिली. पण तुला जायचे तिकडे जा असे आईने सांगितले. याच गोष्टीचा राग मनात ठेवून पोटच्या मुलाने आईवर फावड्याने वार केला. डोक्यावर जबर मारहाण झाल्यामुळे अंजनाबाई खिल्लारी वय वर्ष साठ यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेचे पती बारकू खिल्लारी वय वर्षे 66 यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल खिल्लारी याला अटक करण्यात आली आहे. अमोल खिल्लारी याला तंबाखूचे व्यसन होते. तसेच तो काही कमवत देखील नव्हता. या घटनेनंतर त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!