अंधेरीत ‘नोटा’ चालला म्हणून पुण्यात फुटले फटाके? कोथरूडमध्ये मतदारांच्या आभाराचा बॅनर, पेढे वाटप ! VIDEO

327 0

पुणे : काल रविवारी तिकडं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत NOTA ला 12 हजारांच्या वर मतं मिळाली म्हणून इकडं पुण्यात चक्क फटाके फुटले. इतकंच नव्हे तर NOTA ला सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली म्हणून मतदारांचे आभार मानण्यासाठी मोठा बॅनर देखील उभारण्यात आला. पुण्यातील कोथरूडमध्ये हा प्रकार घडला.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत NOTA ला सर्वाधिक मतं मिळाली म्हणून हा लोकशाहीचा विजय आहे, असं म्हणत कोथरूड डेपो भागात असणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन धनकुडे यांनी कोथरूड येथे मोठा बॅनर उभारला आणि NOTA ला सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली म्हणून मतदारांचेही आभार मानले. फटाके फोडून पेढेही वाटले. इतकंच नव्हे तर धनकुडे यांनी कोथरूड येथील चौकात बॅनर भोवती रांगोळी काढत दिवे देखील लावले.

तिकडं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आपली मशाल पेटली म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं जल्लोष केला तर इकडं पुण्यात NOTA ला 12 हजारांच्या वर मत मिळाल्यानं दिवे पेटले. ते म्हणतात ना, पुणे तिथं काय उणे !

Share This News
error: Content is protected !!