#PUNE : उंड्रीमध्ये दोन अनधिकृत इमारतींवर पालिकेचा हातोडा

985 0

उंड्री : उंड्री (ता. हवेली) येथील स.नं.५१ आणि ५९ मधील अनधिकृत पाच मजली दोन इमारतीवर जॉ कटरच्या सहाय्याने कारवाई केली. सुमारे ३० हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर बांधकाम विकास विभाग झोन-१च्या वतीने कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत शाखा अभियंता शैलेंद्र काथवटे , शाखा अभियंता गोपाळ भंडारी, कनिष्ठ अभियंता अनुप गज्जलवार आणि पोलीस निरीक्षक राजू अडागाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कारवाईसाठी दहा बिगारी, एक जेसीबी, दोन ब्रेकर आणि एक जॉ कटरच्या साहाय्याने कारवाई करून दोन्ही इमारती पाडल्या. कारवाई दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोंढवा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Share This News
error: Content is protected !!