पुणेकरांनो ! पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी पुण्यात दाखल; काळजी घ्या; प्रशासन सतर्क

528 0

पुणे : चीनने गेल्या तीन वर्षापासून जगभर कोरोनामुळे भीतीच वातावरण पसरवलं आहे. कोरोना आणि आज पर्यंत अनेक कुटुंब उध्वस्त केली. अनेकांना कोरोना गेल्यानंतर देखील श्वसनाचे त्रास जाणवतच आहेत. काही दिवसांपासून सर्व निर्बंध काढले असताना, आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी दाखल झाला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून, विमानतळावरच या व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्याचे रिपोर्ट पॉझिटिव आले आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये आता 54 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

सध्या राज्यातील कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पाहता मुंबईमध्ये 49 तर पुण्यामध्ये 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्य सरकारकडून खबरदारी घेण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येते आहे. त्यामुळे पुणेकरांनो पुन्हा एकदा मास्क आणि सॅनिटायझर सोबत घ्यायला विसरू नका. काळजी घेणच सर्वात उत्तम पर्याय आहे.

Share This News
error: Content is protected !!