मोठी बातमी : परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्या दरम्यान गोंधळ

354 0

परभणी : आज पुण्यामध्ये बंद पळून मूक मोर्चा काढण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी आज पुण्यामध्ये शिवप्रेमींनी मोठा मूक मोर्चा काढला आहे. परभणीमध्ये देखील या प्रकरणाचे पडसाद दिसून आले.

आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक दिवसीय परभणी दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान परभणी शहरातील वसंतराव नाईक पुतळा परिसरामध्ये दलित संघटनांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान बावनकुळे यांचा दौरा निश्चित असल्याकारणाने मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. त्यामुळे आंदोलनाला सुरुवात होताच पोलिसांनी नियंत्रण मिळवले आहे.

Share This News
error: Content is protected !!