बच्चू कडूंना दिलासा ! 15 हजारांच्या जातमुचलक्यावर तात्पुरता जामीन मंजूर, वाचा सविस्तर प्रकरण

492 0

२०१७ सालच्या एका आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर बच्चू कडू यांना तात्पुरता जमीन मंजूर करण्यात आला आहे.

२०१७ सालच्या एका आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणी आता बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बच्चू कडू यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरच्या कोर्टात अपीलाच्या कालावधी पर्यंत त्यांना जामीन मिळाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर बच्चू कडू यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

Share This News
error: Content is protected !!