मोठी बातमी : डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात तुफान राडा (VIDEO)

400 0

कल्याण : शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला आहे. शिंदे समर्थक शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत घुसले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला. यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो डोंबिवली मध्यवर्ती शिवसेना शाखेतून काढण्यात आले होते. यामुळे शिंदे गटाचे समर्थक आक्रमक झाले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला.या वेळी यावेळी महिला शिवसैनिक, तरुण आणि पुरुष शिवसैनिकांनी शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना विरोध दर्शवला तो विरोध करत असताना शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आपआपसात भिडले.

तब्बल अर्धा तास मोठ्या प्रमाणात या शाखेत राडा सुरू होता . यावेळी दोन्ही समर्थकांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाणी ही केली.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला.  यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि एकमेकांना शिवीगाळ करत असलेली परिस्थिती पोलिसांनी पाहताच आपला पोलीस बळ वापरून परिस्थिती नियंत्रणात आणली.

सध्या पोलीस नेमका हा प्रकार कशावरून घडला याचा तपास करत आहे . तर साहेबांचे फोटो किंवा बॅनर ऑफिस मधून उतरवले जात असतील आणि तो लावण्यासाठी येऊ देत नसतील हा अपमान सहन करणार नाही . सच्चा शिंदे समर्थक म्हणून आज हे काम आम्ही केलं असे सांगत शिंदे शिंदे समर्थकांनी पुढाकार घेतला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!