CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीत बिघाड ; प्रशासकीय बैठका रद्द…

367 0

मुंबई : राज्यातील सातत्याने होणारे दौरे आणि बैठका यांच्या ताणतणावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीत बिघाड झाला असल्याचे समजते आहे. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला असून , आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान शिंदे गटाच्या आणि शिवसेनेचा सत्ता संघर्ष एकीकडे सुरू असताना ,सुप्रीम कोर्टाने आता 8 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना नक्की कुणाची ?पक्ष चिन्ह नेमकं कुणाचं ?या प्रमुख वादावर ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील अतिवृष्टी ,सत्तासंघर्ष ,मंत्रिमंडळ स्थापना अशा अनेक बैठका आणि दौरे सुरू आहेत सातत्याने होणारे प्रवास यांमुळे त्यांना थकवा जाणवतो आहे यासाठी डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे यासाठीच आज होणाऱ्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत

Share This News
error: Content is protected !!