मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी गणरायाचे घेतलं दर्शन ; म्हणाले हि भेट राजकीय….

329 0

मुंबई : बुधवारी महाराष्ट्रात घरोघरी गणपती बाप्पांचा आगमन झाला आहे. अगदी बॉलीवूड स्टार्स पासून नेतेमंडळी आणि सर्वसामान्य भक्तांच्या घरामध्ये गणपती बाप्पाने आगमन करून नवचैतन्य निर्माण केले आहे.

यावर्षी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.

ही भेट राजकीय नाही…! असे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं असलं , तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची झालेली चर्चा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज ठाकरे यांच्या घरी जाऊन श्री गणेशाचे घेतलेले दर्शन हे आगामी काळातील राजकीय समीकरणाचे नवीन लक्ष असल्याचे देखील बोलले जाते आहे.

दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून , आजची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट देखील महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे .

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!