मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील RSS च्या आद्य सरसंघचालक डॉ. हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन केले वंदन

384 0

नागपूर : आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन वंदन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री स्मृतीस्थळामध्ये दाखल झाले. त्याचबरोबर आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोलवलकर यांच्या देखील स्मृतींना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड हे देखील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, ” हे एक प्रेरणास्थान आहे स्फूर्ती स्थान आहे. इथे नतमस्तक व्हायला आलो आहे. बालपणी संघाच्या शाखेत गेलो होतो. इथे आल्यावर समाधान आहे. आता कोणताही राजकीय हेतू नाही. मुख्यमंत्री बनल्यानंतर मला इथे आल्यानंतर नवा अनुभव मिळाला आहे. शिवसेना-भाजप सोबत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!