मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन

245 0

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र सदनाच्या परिसरात स्थित महापुरुषांच्या पुतळयांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी महाराष्ट्र सदनाच्या दर्शनीभागात स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ, राजेश अडपावार यावेळी उपस्थित होते.

सदनातील मुख्यमंत्री दालनाच्या शेजारी स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच राज्यपालांच्या दालनाशेजारी स्थित क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या प्रतिमेसही मुख्यमंत्र्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Share This News
error: Content is protected !!