चार धाम यात्रा 2023 : ‘या’ दिवशी उघडणारा बद्रीनाथ धामचे दरवाजे, वाचा मुहूर्त आणि बद्रीनाथचे विशेष महत्व

5569 0

चार धाम यात्रा 2023 : हिंदू धर्मात चारधाम यात्रेला खूप महत्त्व आहे. चार धाम यात्रा दरवर्षी विशिष्ट कालावधीसाठी सुरू होते. त्यापैकी बद्रीनाथ धाम यात्रा विशेष आहे. बद्रीनाथ धाम हे भगवान विष्णूचे मुख्य निवासस्थान मानले जाते. या वर्षी बद्रनाथ धमाचे दरवाजे 27 एप्रिल 2023 ला उघडण्यात येणार आहेत. गाडू घड़ा तेल कलश यात्रा 12 एप्रिल 2023 ला निघणार आहे.

बद्रीनाथ धामला पृथ्वीचे वैकुंठ धाम म्हणून देखील ओळखले जाते. असे मानले जाते की भगवान विष्णू येथे 6 महिन्यांच्या विश्रांतीदरम्यान निवास करतात. बद्रीनाथ धाम उघडण्याची वेळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या.

दरवाजे उघडले जाण्याचा शुभ मुहूर्त ,
गुरुवार दि. 27 जानेवारी 2023 ला सकाळी 7:10 वाजता उघडेल. या दिवशी गुरु पुष्य योग आहे.

बद्रीनाथ धाम विषयी महत्वाची माहिती ,

बद्रीनाथ धाम अलकनंदा नदीच्या काठावर दोन पर्वतांमध्ये वसलेले आहे, ज्याचे नाव नर आणि नारायण आहे. या धाममध्ये भगवान विष्णूच्या २४ रूपांपैकी एक असलेल्या भगवान नारायणाची पूजा केली जाते. दरवाजे उघडण्याबद्दल बोलायचे असेल तर या धामचे दरवाजे तीन चाव्याने उघडले जातात. आणि तिन्ही चाव्या वेगवेगळ्या लोकांकडे सुरक्षित ठेवल्या जातात. दरवाजा बंद करताना भगवान विष्णूच्या शालग्रामशिलापासून बनविलेल्या मूर्तीवर तूप लावले जाते. दरवाजे उघडल्यानंतर श्रीहरीच्या मूर्तीवरील तूप शाबूत असेल तर हे वर्ष सर्वांसाठी आनंदाचे राहील. पण तूप कोरडे असेल तर ते संकटाचे किंवा दुष्काळाचे लक्षण मानले जाते.

Share This News
error: Content is protected !!