CHANDRASHEKHAR BAVANKULE : म्हणून राज ठाकरे आले होते …! या भेटीत राजकीय चर्चा…

336 0

नागपूर : भाजप-शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर आता शिंदे गट मनसे सोबत युती करणार अशा देखील चर्चांना उधाण आले होते. दरम्यान भाजप किंवा शिंदे गटासोबत युती करण्याचा कोणताही मानस नसल्याचं राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. दरम्यान नागपूर दौऱ्यावर सध्या राज ठाकरे आहेत. आगामी महापालिका निवडणुका पाहता पक्ष विस्ताराच्या कामकाजासाठी राष्ट्राकडे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत.

अधिक वाचा : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिंदे-भाजप गटाचा 76 ग्रामपंचायतींवर झेंडा ; वाचा निकाल आत्तापर्यंत…

यादरम्यान त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीवरून पुन्हा एकदा आता भाजप मनसे युती होणार, अशा चर्चांना उधाण आले होते. यावर आता स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले की , “राज ठाकरे हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत .ते माझे चांगले मित्र आहेत. दिलदार व्यक्ती आहेत ,म्हणून माझी त्यांच्यासोबत पक्की मैत्री आहे. मी त्यांना आमंत्रण दिलं होतं. नागपूरला आल्यानंतर तुम्ही आमच्या घरी या म्हणून , त्यामुळे ते आले होते. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.” असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे

Share This News
error: Content is protected !!