सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलली, या तारखेपर्यंत करता येणार नावनोंदणी

193 0

मुंबई- सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना ११ मे च्या मध्यरात्रीपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

एमएचटी सीईटी, एमबीए, एमसीए पदव्युत्तर आर्किटेक्चर, पदव्युत्तर एमएचसीटी या परीक्षांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात होती.

सीईटी परीक्षांचता तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. इतर परीक्षांच्या वेळी एमएचटी सीईटी परीक्षा असतील तर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो. म्हणून सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवर ही माहिती दिली होती. या परीक्षांच्या तारखांचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!