फार्म हाऊसमध्ये CASINO …! दारूच्या बाटल्यांचा खच…! पोलीस इन्स्पेक्टर , तहसीलदार यांच्यासह 70 जण ताब्यात

387 0

राजस्थान : राजस्थानच्या जयपुर जिल्ह्यातील जयसिंहपुरा मधून एक खळबळजनक माहिती समोर येते आहे . जयपूर जिल्ह्यातील जयसिंहपुरा येथील खोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका फार्म हाऊस मध्ये कसीनो सुरू असल्याची माहिती पोलिसांना सूत्रानमार्फत मिळाली होती . या फार्म हाऊसवर जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा या ठिकाणावरून 13 महिलांसह 70 जणांना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे या फार्म हाऊसमध्ये casino वर जुगार खेळला जात होता. पोलिसांनी या ठिकाणावरून 23 लाख रुपये जप्त केले आहे. पोलीस या ठिकाणी पोहोचले तेव्हा हे सर्व जण दारूच्या नशेत होते . पोलिसांच्या सीएसटी टीमने या 70 जणांना शिताफीने ताब्यात घेतला आहे . तरी या ठिकाणी मोठा दारूचा खच पडला होता.

त्यासह पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार , या 70 जणांमध्ये हैदराबादचा एक इन्स्पेक्टर आणि तहसीलदार यांचा देखील समावेश असून आणखी काही मोठ्या व्यक्तींचा देखील समावेश आहे.

Share This News
error: Content is protected !!