पुणे : नगरसेवक गफूर पठाण यांच्याविरुद्ध ॲडव्हर्टायजिंग कंपनी प्रतिनिधीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल

662 0

पुणे : नगरसेवक गफूर पठार यांच्याविरुद्ध ऍडव्हर्टायझिंग कंपनी प्रतिनिधीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्शन आऊट डोअर ऍडव्हर्टायझिंग या कंपनीमध्ये नोकरीस असणारे अतुल संगमनेरकर हे कंपनीचे कोंढवा येथील जाहिरातीचे होर्डिंगवर हाजी गफूर पठाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर कंपनीची परवानगी न घेता लावण्यात आले होते. या प्रकरणी कंपनीने त्यांचे बिल हे त्यांच्या ऑफिसवर पाठवले होते. या बिलाची रक्कम घेण्यासाठी संगमनेरकर हे हाजी गफूर पठाण यांना भेटण्यासाठी गेले होते.

यावेळी हाजी गफूर पठाण यांनी संगमनेरकर यांना शिवीगाळ आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना बिलाचे पैसे देण्यास असहमती दर्शवली. याप्रकरणी संगमनेरकर यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी आता हाजी गफूर पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळीणकर करीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!