कलकत्ता उच्च न्यायालयाचा मोठा निर्वाळा; ‘वंध्यत्व’ घटस्फोटाचा आधार होऊ शकत नाही !

1116 0

कलकत्ता : आजच्या युगात देखील वंध्यत्वामुळे अनेक गुन्हेगारी वृत्त उजेडात येत आहेत. काळी जादू ,आघोरी पूजा ,हत्या अशा गुन्ह्यांसह मूल होत नाही म्हणून पत्नीला डिव्होर्स देखील दिले जातात. पण आता कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यानुसार व्यंधत्व हा घटस्फोटाचा आधार असू शकत नाही.

कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये पतीने दाखल केलेली घटस्फोटाची याचिका कलकत्ता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सहा वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या जोडप्याने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. यामध्ये पत्नी कधीही आई होऊ शकत नाही ,म्हणून पतीला डिव्होर्स घ्यायचा होता. ही याचिका कोर्टात दाखल केल्यानंतर पत्नीने बेलिया घाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पत्नीने पती विरुद्ध मानसिक शारीरिक छळ आणि क्रौर्य या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

पत्नीच्या अचानक मासिक पाळी थांबल्यामुळे तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य खचले होते. याप्रकरणी न्यायमूर्ती शंपा दत्त यांच्या कोर्टाने दिलेल्या निर्वाळ्यानुसार, पालक होण्यासाठी अनेक पर्याय आहेत. या परिस्थितीत जीवनसाथीला समजून घेणे आवश्यक आहे. कारण एकच जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला मानसिक शारीरिक ताकद परत मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. या महिलेवर आता बेंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्स मध्ये उपचार सुरू आहेत.

Share This News
error: Content is protected !!