देहुरोड- भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कात्रज- देहूरोड बायपास रस्त्यावर किवळे, देहूरोड येथे आज सकाळी ११ वाजता घडला. या अपघातात आई आणि मुलीचा मृत्यू झाला तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले.
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून एकाच कुटुंबातील चौघेजण वाकड येथून देहूरोडच्या दिशेने जात होते. किवळे पुलावर आले असतं एका भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले. कंटेनर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.
वडिलांवर पवना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुलाला किवळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे देहूरोड बायपास रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.