#BREAKING : भर दुपारी सिंहगड रस्त्यावर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर गोळीबाराचा थरार; वॉट्सअप पोस्टवरून झाले वाद, बांधकाम व्यावसायिकाने केला गोळीबार

813 0

पुणे : पुणे शहरामध्ये सध्या गुन्हेगारीच्या धक्कादायक वृत्तांनी शहरांमध्ये दहशत पसरली आहे. एकीकडे कोयता यांची दहशत असताना सिंहगड रस्त्यावरील सनसिटी भागामध्ये भर दुपारी गोळीबार झाला आहे. 

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, व्हाट्सअप ग्रुपवर आलेल्या एका पोस्ट वरून झालेल्या वादामध्ये बांधकाम व्यवसायिक असलेल्या संतोष पवार यांनी रमेश राठोड यांच्यावर गोळीबार केला आहे. संतोष पवार. देवा राठोड आणि रमेश राठोड हे सनसिटी रोडवर बोलत थांबले होते.

व्हाट्सअपवरील या पोस्टवरून संतोष पवार आणि देवा राठोड यांच्यामध्ये बाचाबाची झाली. आणि रागाच्या भरात संतोष पवार यांनी त्याच्या जवळील पिस्तुलातून गोळीबार केला. हे भांडण थांबवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या रमेश राठोड हे या गोळीबारात जखमी झाले आहेत. रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागली असल्याचे समजते.

धक्कादायक म्हणजे भर दुपारी सनसिटी सारख्या वर्दळीच्या ठिकाणी आणि पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर गोळीबार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Share This News
error: Content is protected !!