Breaking News : हवेली तहसीलदार तृप्ती कोलतेंवर निलंबनाची कारवाई

514 0

पुणे : हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मौजे हडपसर येथील जमिनीबाबतच्या एका गैरव्यवहारा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्य महसूल मंत्री यांचे कोणतेही आदेश नसताना आणि पुणे जिल्हाधिकारी यांचे कोणतेही आदेश प्राप्त करून न घेता, त्यांनी या जमिनीचे अनाधिकाराने प्रदान केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

त्यासह कोविड-19 या विषाणूच्या संसर्गजन्य गंभीर परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत असताना आणि आवश्यक सेवा सुविधा प्राप्त करून घेताना उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या 2016 साली शासन निर्णयातील तरतुदीनुसार गैरव्यवहाराने वित्तीय अनियमितता केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कोलते यांच्याविरुद्ध निवडणूक विषयक कामकाजाच्या तक्रारी देखील गंभीर स्वरूपाच्या असल्याकारणाने शासन सेवेतून त्यांना निलंबित करण्यातचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide