Breaking News, राज ठाकरे यांची सभा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्यालाच एक लाखांचा दंड

158 0

औरंगाबाद- राज ठाकरे यांची सभा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तसेच याचिकाकर्त्याला १ लाखांचा दंडही ठोठावला आहे.

औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र ही सभा रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका रिपब्लिकन युवा मोर्चाकडून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे करण्यात आली होती. सभा आणि रॅलीला मनाई करणारा हुकूम द्यावा अशी मागणी करण्यात आली होती.

न्यायालयात सुनावणीच्यावेळी पोलीस आयुक्तांनी दिलेले आदेश सादर करण्यात आले. तसेच सभेबाबत पोलीस आयुक्तांनी सर्व प्रकारची खबरदारी घेतली असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर संबंधित याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे नमूद करून याचिकाकर्त्यांना १ लाखांचा दंड ठोठावून याचिका फेटाळून लावली.

Share This News

Related Post

आनंदाची बातमी ! 1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील होणार, मात्र मास्क अनिवार्य

Posted by - March 30, 2022 0
मुंबई- कोरोना महासाथीमुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंधात वावरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात चांगले यश येत…
nirmala sitaraman

CAIT ने अर्थमंत्री सीतारामन यांना पेय पदार्थांवरील कर कमी करण्याची केली विनंती

Posted by - May 9, 2023 0
पुणे : किराणा स्टोअर्स, जनरल स्टोअर्स, पान शॉप्स आणि फेरीवाले यांसारख्या छोट्या किरकोळ विक्रेत्यांचे समर्थन करत, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया…

लता मंगेशकर यांचं निधन ; केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहिली काव्यमय श्रद्धांजली

Posted by - February 6, 2022 0
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला लता मंगेशकर यांच्या निधनाने…

मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या मोर्च्यायापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात येत असून या महामोर्चाच्या आधी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री…

जलसमाधी आंदोलन होणार? रविकांत तुपकरांना मुंबई पोलिसांची नोटीस; शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक

Posted by - November 23, 2022 0
मुंबई : शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक झाली असून, जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना सोबत घेऊन रवाना झाले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *